लग्नाच्या(marriage)सुरुवातीला सगळं काही चांगलं वाटतं पण अनेकदा काही दिवसात दोघांमध्ये काहीतरी गोंधळ होतो किंवा काही चुका होतात. त्याचं कारण म्हणजे दोघांना एकमेकांची सवय व्हायला वेळ लागतो, पण तोपर्यंत काही गोष्टींमध्ये गोंधळ होणं हे साहजिक आहे. याच काळात पती-पत्नीचं नातं हे घट्ट होण्यास देखील मदत होते. मात्र, याकाळात जर जोडप्यांमध्ये कोणत्या गोष्टीवरून मतभेद झाले आणि ते लवकर सोडवण्यात आले नाही तर नात्यात दुरावा येऊ शकतो. अशात या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या हे जाणून घेऊया.
बरेच लोक लग्न(marriage) झाल्यावर आपल्या बायकोवर किंवा नवऱ्यावर हक्क गाजवू लागतात. कधीच आपल्या पार्टनरवर हक्क गाजवू नये त्याने अनेकदा समोरच्याला त्रास होऊ शकतो. अनेकांना अशा नात्यात गुदमरल्यासारखे वाटू शकते आणि त्यामुळे तुमच्या नात्यात अंतर येऊ शकतं. आपल्या पार्टनर्सना स्वातंत्र्य द्यायला हवं आणि त्यांचावर विश्वासही ठेवला पाहिजे.
लग्नानंतर कोणत्या व्यक्तीसोबत किंवा कोणत्याही कपलला घेऊन पार्टनरची तुलना करू नये, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि नात्यात नकारात्मकता निर्माण होऊ शकते. तुमच्या पार्टनरच्या मनात चुकीचे विचार येऊ शकतात. त्यामुळे कधीच तुम्ही कोणाशी पार्टनरची तुलना करू नये.
नात्यामध्ये दोघांनाही मत मांडण्याचा समान अधिकार असतो. लग्नाच्या सुरुवातीला आपल्या पार्टनरचे बोलणे न ऐकता किंवा त्याचं कोणत्याही गोष्टीवर काय मत आहे हे जाणून न घेता आपल्याचं गोष्टींना महत्व देणं हे चुकीचं आहे, त्यामुळं नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो.
लग्नानंतर बऱ्याचदा पती-पत्नी एकमेकांच्या कुटुंबीयांची तुलना करु लागतात, त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. दोघांचेही कुटुंब हे आपआपल्या ठिकाणी बरोबर असतात, तर असे काही बोलू नये ज्यानं तुमचा पार्टनर दुखावला जाईल.
बऱ्याचं वेळी लोकं दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन आपल्या पार्टनरबद्दल गैरसमज करुन घेतात. सुरवातीच्या काळात आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवणे फार गरजेचे आसते. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने नाते घट्ट होऊ लागते. हे गैरसमज होण्यापासून वाचण्यासाठी समोरची व्यक्ती जे काही सांगेल त्यावरून आपलं मत तयार न करता पार्टनरला किंवा जोडीदाराला त्यावर काय म्हणायचं आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
‘जर तुझ्या बायकोला बाळ होणार असेल….’, गावसकर रोहित शर्माला स्पष्टच बोलले
जगातील सर्वात उष्ण वर्ष? संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा
कॉंग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन