रेशनसाठी ई-केवायसीची नवीन सुविधा, घरबसल्या अपडेट करा माहिती

 राज्यातील सर्व रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात (update)आली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनच्या सहाय्याने केली जात होती. मात्र, त्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानात जाण्याची गरज नाही, तर ते घरी बसून आपल्या मोबाईलवरूनच ई-केवायसी करू शकणार आहेत. यासाठी सरकारने 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

रेशनकार्डधारकांसाठी मोठा बदल :

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमार्फत धान्य वितरित केले जाते. यासाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी ‘मेरा ई-केवायसी’ नावाचे मोबाईल ॲप कार्यरत करण्यात आले आहे. या ॲपच्या मदतीने लाभार्थी (update)स्वतःच आणि त्यांच्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे ई-केवायसी घरबसल्या करू शकतात.

Ration l घरबसल्या कसे कराल ई-केवायसी अपडेट? :

ई-केवायसी करण्यासाठी दोन महत्त्वाची ॲप्स वापरावी लागणार आहेत – आधार फेस आरडी सेवा आणि मेरा ई-केवायसी . ही दोन्ही ॲप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर, फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने झटपट आणि सोप्या पद्धतीने पडताळणी करता येते. या प्रक्रियेमुळे रास्त भाव दुकानदार किंवा(update) इतर कोणताही अधिकृत सदस्य सहजपणे ई-केवायसी करू शकतो.

रेशनकार्डधारकांसाठी सोयीस्कर सुविधा :

सरकारच्या या नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना दुकानात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही. घरबसल्या ई-केवायसी करण्याची सुविधा मिळाल्याने वेळेची बचत होईल, तसेच प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होईल.

हेही वाचा :

‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत

‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग

खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या