निरोगी आणि चमकदार त्वचा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आजच्या (healthy diet)काळात प्रदूषण, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खराब आहार यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. आजकाल लोकं आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेचे विविध उपचार घेतात. त्याचबरोबर अनेकांना त्यांचा चेहरा नैसर्गिक पद्धतीने चमकवायचा असतो. यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतात.

चेहरा चमकदार करण्यासाठी गुलाबजल खूप फायदेशीर आहे. बरेच लोकं गुलाबजल टोनर म्हणून त्वचेवर लावतात. त्याचबरोबर गुलाबाप्रमाणे आणि इतर काही फुले आहेत जी तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार करण्यास मदत करतात. त्यापासून तुम्ही नॅचरल फेसपॅक बनवू शकता. ही फुलं तुमची त्वचा हेल्दी तसेच चमकदार ठेवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊयात कोणती फुलं आहेत जी त्वचा चमकदार आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात.
गुलाबाचे फुल
आपल्यापैकी अनेकजण चेहऱ्यावर गुलाबपानायचा वापर टोनर म्हणून करतात. पण याव्यतिरिक्त गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर तुम्ही फेस मास्क बनवून देखील चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार होण्यास मदत होते. गुलाबाच्या पाकळ्यांचा फेस पॅक बनवण्यासाठी (healthy diet)गुलाबाच्या २ ते ३ पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा. नंतर या पेस्टमध्ये मध आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा चांगला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसेल.
झेंडूचे फुल
झेंडूच्या फुलांचा वापर पूजेसाठी किंवा घर सजवण्यासाठी आपण नेहमी करत असतो. पण तुम्ही कधी झेंडूच्या फुलांचा वापर चेहरा चमकदार ठेवण्यासाठी केला आहे का? दरम्यान झेंडुच फुल चेहऱ्यावर चमक टिकवून ठेवण्यास देखील मदत करू शकतात. झेंडूच्या फुलांचा फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम झेंडूची फुले पाण्याने धुवून घ्या. नंतर रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता त्यात दही आणि चंदन पावडर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते २० मिनिटे लावल्यानंतर पाण्याने धुवून टाका. दह्याऐवजी गुलाबपाणी ही मिसळू शकता. अश्याने तुमची त्वचा हेल्दी राहील.

चमेलीचे फुल
चमेलीच्या फुलांपासून तुम्ही फेस मास्क देखील (healthy diet)तयार करू शकता. ते बनवण्यासाठी ६ ते ८ चमेलीची फुले बारीक करून पेस्ट तयार करावी. आता त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. या फुलाचे फेस पॅक त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात.
हेही वाचा :
RBI कडून लवकरच मिळणार खुशखबर?; सामान्यांना मिळणार मोठा दिलासा!
“अमिताभजी त्यांना …”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर सोनू निगमचा खोचक टोला
Income Tax नंतर आता टोलबाबतही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; गडकरींनी दिले संकेत