मुंबई विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना(students) आता एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला असून, विविध विद्यापीठांशी आणि संस्थांशी सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे, विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग करत, ज्ञानवृद्धी करणे शक्य होणार आहे.

सुरुवातीला, मुंबई विद्यापीठाने डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठासोबत शुक्रवारी सामंजस्य करार केला. या करारानुसार, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठातील विद्यार्थी(students), मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. या अंतर्गत, विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्या मिळवू शकतील. डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ यजमान विद्यापीठ म्हणून काम पाहणार आहे, तर दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्र सहयोगी संस्था म्हणून कार्य करणार आहे.
मुंबई विद्यापीठाने डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठासोबतच नाही, तर पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि एचएसएनसी विद्यापीठासह अन्य नामांकित महाविद्यालयांबरोबरही दुहेरी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी बोलणी सुरु केली आहे. सीओईपी विद्यापीठाशी करार अंतिम टप्प्यात असून, लवकरच इतर विद्यापीठांशी देखील प्रशासकीय बाबी पूर्ण करून करार केले जातील, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुहेरी पदवी अभ्यासक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना बीए, बीकॉम, बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीएससी (माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र) यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांसोबतच, एमए, एम. कॉम (ॲडव्हान्स अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट) एमससी (मॅथेमॅटिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि संगणकशास्त्र) एमएमएस आणि एमसीए यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे.
हेही वाचा :
ठाकरेंचा काँग्रेसला ‘दे धक्का’, जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात…
बँकिंग क्षेत्रात मॅनेजर पदासाठी भरती; आजच अर्ज करा, ‘या’ तारखेपर्यंत करता येईल Apply
दोन भावांच्या भांडणात धाकटा भाऊ पडला विहिरीत; छातीला मार लागला अन्…