भाजपाच्या आक्षेपार्ह जाहिराती आल्या अंगाशी, बावनकुळे विरोधात गुन्हा दाखल

तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी जाहिरात भाजपने केली होती. याप्रकरणी काँग्रेसकडून(congress) तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाची ही जाहिरात असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

हेमंत करकरे यांचा मत्यू दहशतवादी कसाब याच्या गोळीने नाही तर संघ समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱयाने मारलेल्या गोळीने झाला होता असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले होते. माजी पोलीस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देऊन त्यांनी हे विधान केले होते. या माध्यमातून त्यांनी भाजपा उमेदवार निकम यांना लक्ष्य करायचे होते. या प्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(congress)


भाजपकडून मागील आठवडय़ात प्रमुख माध्यमांमध्ये दिलेल्या जाहिरातीत पाकिस्तानचा उल्लेख केला होता. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा, भारतात की पाकिस्तानात? अशी ती जाहिरात होती. याप्रकरणी काँग्रेसकडून तक्रार झाल्यानंतर आयोगाने ठाण्यात गुह्या दाखल केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


बारामतीतही गुन्हे दाखल
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकी दरम्यान मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसे वाटप झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी देखील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुठेही आचारसंहिता भंगाचे गुन्हे घडत असतील तर त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला कळवावे. त्यासाठी सी-व्हिजिल अॅपदेखील सर्वसामान्यांना उपलब्ध असल्याचे एस.चोक्कलिंगम आणि अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा :

16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

‘तुला अधिकार नाहीत…’ करिना कपूर सावत्र मुलाबद्दल असं का म्हणाली?

इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव!