जळगामधील परांडा रेल्वेस्टेशनवर मोठी दुर्घटना घडली असून दोन ट्रेनची(train) एकमेकांना धडक झाली आहे. यात अनेक प्रवाशाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, बंगळुरू एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्याची माहिती आहे.

जळगावमधील परांडा रेल्वे (train)स्थानकानजीक पुष्पक एक्स्प्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्स्प्रेसनं या प्रवाशांना उडवलं. यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगावमधील परांडा रेल्वे स्थानकाजवळ हा भयंकर अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्स्प्रेसमधून अचानक धूर निघू लागला. एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची भीती प्रवाशांमध्ये पसरली. त्यानंतर त्यातील काही प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेच्या रुळांवरून बेंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं रेल्वे ट्रॅकवर उतरलेल्या काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस अचानक थांबली. त्यामुळं ठिणग्या उडाल्या आणि धूर निघू लागला. एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचा समज काही प्रवाशांचा झाला. त्यातील अनेकांनी भीतीपोटी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरून बेंगळुरू एक्स्प्रेस जात होती. या एक्स्प्रेसने काही प्रवाशांना उडवलं. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ३१ जानेवारीपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा २ हजार मिळणार नाहीत
शर्टाचा खिसा डाव्याबाजूलाच का असतो? कारण अतिशय Interesting
आधुनिक शेतीचा नवा आदर्श! सांगलीच्या पठ्ठ्यानं केली कमाल, 25 गुंठ्यात घेतलं 4 लाखांचं उत्पन्न