Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु

सध्या आपण ‘गुगल सर्च’चा फ्रीमध्ये वापर करत आहोत. परंतु आता कंपनी(google) मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय. ‘गुगल सर्च’ची पेड सर्व्हिस सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी त्यावर विचार करत असून त्यादृष्टीने लवकरच मोठे बदल होणार आहेत. कंपनीकडून अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार गुगल(google) कंपनी पेड व्हर्जनसाठी मोठी तयारी करत आहे. आतापर्यत कंपनीने त्यांचं सर्च फिचर फ्री दिलेलं होतं. सर्चमधूनच कंपनीचा रेव्हेन्यू जनरेट होतो. आता कंपनी पॉलिसीमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. हे प्रीमियम फिचर वेगळंकाही नसून जनरेटिव्ह एआय आहे.

गुगलने मागे ‘गुगल सर्च’सोबत जनरेटिव्ह एआयचं स्नॅपशॉर्ट हे फिचर प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला सर्च केलेल्या टॉपिकच्या संबंधाने एआय रिझल्ट्स दिसून येतात.

AI सर्च केलेल्या टॉपिकची एक समरी युजर्सला दिसते. आता यामध्येच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. जर गुगल असं काही करत असेल तर ही मोठी घडामोड घडणार आहे.

गुगल कंपनीने सर्च आणि सर्चच्या संबंधाने दिसणाऱ्या जाहिरातींवर मागच्या वर्षात १७५ अरब डॉलर्स कमावले आहेत. कंपनीच्या एकूण कमाईपेक्षा हा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आहे. या कारणास्तव कंपनी आपल्या सर्च फिचरच्या माध्यमातून आणखी पैसे कमावण्याच्या विचारात आहे.

गुगल सर्चमधून कंपनी भरपूर कमाई करते, पण ChatGPT आल्यानंतर कंपनीच्या व्यवसायाला धोका निर्माण झाला. हा प्लॅटफॉर्म लाँच होऊन जवळपास दीड वर्ष झाली आहेत. आता गुगल कंपनी आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये मोठा बदल करण्याच्या विचारात आहे.

हेही वाचा :

सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाला अटक, आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

हे कसले अँगल्स, कुठे झूम करताय? पापाराझींवर भडकली अभिनेत्री