सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे (installation)आदेश दिले आहेत. या आदेशामुळे राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार केलेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य केले आहे. तसेच यासाठी आता राज्य परिवहन विभाग अलर्ट मोडवर आलेला पाहायला मिळत आहे. एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या गाड्यांवर काका, मामा, दादा असे नंबर असणारी गाडी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन आयुक्तालयाच्या सूचनेनुसार सर्व आरटीओंमार्फत 18 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी, वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि वाहनांवरील छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.राज्यात 2019 नंतर नोंदणी झालेल्या नव्या वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक असताना अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याने परिवहन आयुक्तालयाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व वाहनांची तपासणी करून कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
2019 पूर्वीच्या वाहनांमध्ये एचएसआरपी प्रकारच्या नंबर प्लेट बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. यासाठी 30 एप्रिलपर्यंत या प्रकारच्या नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर ज्या वाहनांवर या नंबर प्लेट नसतील, त्यांच्याविरोधात परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं वाहनधारकांनी वेळेवर या नंबर प्लेट लावून घेण्याचं आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात (installation)आलय. 31 मार्चपर्यंत असलेली मुदत एका महिन्याने वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यानंतर मोटार वाहन कायदा कलम 177 नुसार 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. राज्यातील सुमारे 2 कोटी गाड्यांची (installation)नोंदणी 2019 पूर्वी झाली असून या सर्व गाड्यांना एचएसआरपी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु 2019 पूर्वीच्या फॅन्सी नंबरच्या गाड्या रस्त्यांवर धावत असल्याने केवळ अशाच गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. असं परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :
भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे Live Streaming कधी आणि कुठे पाहता येणार?
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या
देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान घडला धक्कादायक प्रकार!