मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच लग्नबंधनात(wedding) अडकली आहे. खूप दिवसांपासून अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सुरु होती. या काळात अभिनेत्रीने तिच्या लग्नाची तयारी देखील चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केली होती. परंतु अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचा नाव आणि चेहरा समोर आला नव्हता. आता अखेर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेत्री आता पवनसह लग्नबंधनात(wedding) अडकली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रेश्माच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पुण्यात अभिनेत्रीचा शुभविवाह सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या फोटोंमध्ये रेश्मा आणि पवन यांचा पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेश्मा आणि वर पवन यांचा लग्नासाठीचा मराठमोळा लूक खूप खास आहे. अभिनेत्रीने यावेळी गुलाबी रंगाची नऊवारी साडी हिरवा चुडा, चंद्रकोर, नाकात नथ, केसात चंद्रकोरचा खूप आणि मोत्यांचे दागिने परिधान करत आकर्षित लुक तयार केला आहे. तर अभिनेत्री रेश्माच्या नवऱ्याने ऑफ व्हाईट शेरवानी, धोतर आणि गुलाबी रंगाचा शेला परिधान करत नवऱ्या मुलाचा लूक खूप सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये दोघेही अप्रतिम दिसत आहे. या दोघांना पाहून चाहत्यांची नजर त्याच्याकडून हटतच नाही आहे.
अभिनेत्री रेश्माने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट केले आहेत. चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील तिला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. या शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नवरदेव पवनसह सप्तपदी घेताना दिसत आहे. याचदरम्यान कानपिळी विधीचा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे. बरेच दिवसांपासून रेश्माच्या लग्नाची चर्चा सुरु होती.
रेश्माने तिच्या नवऱ्याबाबत काहीचं उघड केले नव्हते. अखेर काल अभिनेत्रीच्या हळदीदिवशी तिच्या नवऱ्याचा फोटो समोर आला. रेश्माने तिच्या हळदीदिवशी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवऱ्याची झलक चाहत्यांना दिसली. याचदरम्यान अभिनेत्री आणि तिचा नवरा पवन या दोघांचीही जोडी सुंदर दिसत आहे.
कामाच्या आघाडीवर, मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. तसेच रेश्माने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण देखील केले आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. रेश्माने पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून पुण्यात कोथरुड येते स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे.
हेही वाचा :
महायुतीत मोठ्या घडामोडी! महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार
लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड ; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती
दिल्लीने डोळे वटारले तर… शिंदेकडे काही पर्याय नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल