पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा!

पंतप्रधान किसान (Farmer)सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून, तो येत्या सोमवारी, 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे.
तर, महाराष्ट्रातील सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या योजनेअंतर्गत, राज्यातील 92 लाख 89 हजार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणजेच, एकूण 1 हजार 967 कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

पंतप्रधान किसान(Farmer)सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार, पात्र शेतकरी कुटुंबाला (पती, पत्नी आणि त्यांची 18 वर्षांखालील मुले) दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात.

ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी दोन हजार रुपये) दिली जाते. 19 वा हप्ता जानेवारी महिन्यातच जमा होणे अपेक्षित होते, परंतु, मुख्य कार्यक्रमासाठी पंतप्रधानांच्या उपलब्धतेमुळे विलंब झाला. आतापर्यंत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 18 हप्त्यांमध्ये सुमारे 22 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

आम्ही सामान्य आहोत, तुझ्यासारखं…’, रश्मिका मंदाना रणबीर कपूरला स्पष्टच बोलली

शेअर बाजाराची बदलली चाल, गुंतवणूकदारांची गर्दी; ‘या’ शेअर्सनी भरला जोश

पोलीस उपनिरीक्षकाकडून पत्नीचा भररस्त्यात छळ, व्हिडीओ व्हायरल