दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले

मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी(politics) दुर्घटना घडली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७४ लोक जखमी आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पापांचा बळी गेल्यामुळे सर्वत्र हळहळ अन् संताप व्यक्त होत आहे. अशातच या दुर्घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेल्या भाजप आणि महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांमध्ये श्रेयवादावरुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमुळे मुंबईसह राजकीय(politics) वर्तुळातही खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. मुख्यमंत्री शिंदेंसह, शिक्षणमंत्री दिपक केसरकर तसेच भाजप, मविआच्या स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी ईशान्य मुंबई लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील आणि महायुतीचे मिहिर कोटेचा यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. झालं असं की, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. तितक्यात महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा हे देखील आमदार पराग शाह यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले.

परंतु संजय दिना पाटील यांनी पराग शहा आणि मिहीर कोटेचा यांना घटनास्थळावर जाण्यापासून रोखले. घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका अशी तिखट प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी पराग शहा आणि मिहीर कोटेच्या यांच्यासाठी दिली. तर पराग शहा आणि संजय पाटील यांच्या मध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडालेली दिसून आली.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (14-05-2024)

तळीरामांसाठी महत्वाची बातमी! मतमोजणीच्या निकालापर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश

३ वर्षांपासून ऑडिशन सुरू, ती १००% दयाबेन…; दिशा वकानी ऐवजी कोण येणार ?