मी दुजाभाव केला नाही, जर…; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर

MLA

राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला २ आमदार(MLA) वगळता सगळे आमदार, खासदार उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी शेवटपर्यंत राहून हे सरकार कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत राहणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील. काही आमदार परत आलेत. नितीन देशमुख, कैलास पाटील यांनी तिथे काय घडलं हे सांगितले. गुवाहाटीत जे आमदार(MLA) आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे. आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पक्षाची भूमिका महाविकास आघाडी सरकार टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहोत असं सांगितले.

तसेच मित्रपक्ष वेगळ्या प्रकारे विधान करत आहेत. सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आले. ३६ पालकमंत्री नेमले, प्रत्येकाला समसमान वाटप केले. निधीमध्ये कुठेही कपात केली नाही. निधी वाटप सगळ्यांना झाले. मी कधीही दुजाभाव केला नाही. मी सगळ्यांना विकासकामात मदत करण्याची भूमिका माझी असते. मी सकाळी कामाला सुरूवात करून बैठका घेऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. मविआच्या बैठकीत काही तक्रारी केल्या असत्या तर समज-गैरसमज दूर झाले असते. सध्या महाविकास आघाडी कशी टिकेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं प्रत्युत्तर अजित पवारांनी नाना पटोलेंना दिले आहे.

दरम्यान, १७० आमदारांच्या(MLA) पाठिंब्यावर हे सरकार अस्तित्वात आले. उद्धव ठाकरे सरकारचे प्रमुख असतील हे शरद पवारांनी सांगितले. ज्या पक्षाचे आमदार निवडून आले. त्याच्या मतदारसंघात लुडबूड करायची नाही हे ठरले आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद झाले असतील. परंतु आमदारांना कुठेही त्रास होऊ नये असेच प्रयत्न केले आहेत असंही अजित पवारांनी सांगितले.

Smart News:-

उद्धव ठाकरे कोव्हिड पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?


संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा!


जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान!


हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू!


Leave a Reply

Your email address will not be published.