सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. हा सत्तासंघर्ष निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात(supreme court) महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटासह राज्यातील कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

आज सकाळी साडे दहा वाजता कोर्टात सुनावणीला सुरूवात होणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या(supreme court)) घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का याचं उत्तर मिळणार आहे. निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर करण्यात आलेली आहेत. आता प्रत्यक्ष सुनावणीला, युक्तीवादांना सुरुवात कधी होईल याचं उत्तर आयोगात मिळेल. धनुष्यबाण कुणाचा याचं उत्तर याच आयोगाच्या लढाईतून मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस महत्वाचा असणार आहे.

हेही वाचा :