मी शस्त्रक्रियेच्या गुंगीत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

त्यामुळे आरोप-प्रत्यारोप पक्ष प्रवेश अशा घटनांचा समावेश आहे. शिंदे गट वेगळा झाल्यापासून महाराष्ट्रात शिवसेना अस्थिर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत न्यायालयात प्रकरण सुरु आहे. लढाई दोन्ही बाजूकडून अस्तित्वाची झाली आहे. त्यातचं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. त्याची चर्चा अधिक आहे. उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) फुटलेल्या आमदारांवरती सडकून टीका केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राजकीय घडामोंडीची त्यांनी उत्तरे दिली आहेत. माझे सरकार गेले, मुख्यमंत्री पद गेले याची अजिबात खंत नाही. पण माझी माणसं दगाबाज निघाली असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे हॉस्पीटलमध्ये असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न केला हे देखील त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.
ज्यांनी माझ्या दगाबाजी केली आहे. त्यांनी स्वत:च्या बापाच्या नावानी मते मागावीत. आमच्या बापाच्या नावाने मते मागू नका. त्याचबरोबर शिवसेना कायद्याची आणि रस्त्यावरती लढाई जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातली जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. शिवसेना कोणाची याचे पुरावे द्यायची गरज नाही. लोकं म्हणतात निवडणुका येऊ द्या आम्ही यांना पुरुन टाकतो. फुटीर आमदारांच्या टीकेला देखील त्यांनी जबरदस्त उत्तरे दिली आहेत.
उद्धव ठाकरेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट
होय सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीपणा होता. ती सगळं पाणी झाडाकडुन पडत आहेत. आणि हे बघा झाडं कस उघडंबोकडं झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो असं उदाहरण देखील त्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची सामना पेपरसाठी मुलाखत घेतली आहे.
सोलापूर महापालिका निवडणुक, राजकीय परिवर्तनामुळे महापालिकेवर भाजपाची पकड अधिक घट्ट होणार का?
तब्बल 6 लाख आधार कार्डची रद्दी!
आज सोनिया गांधींची पुन्हा ईडीकडून चौकशी होणार, 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये