बिहारमधील आमदार अनंत सिंह यांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा

MLA Anant Singh

बिहारमधील राजदचे दिग्गज नेते आणि आमदार अनंत सिंह(MLA Anant Singh) यांना लडमा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात एके-47 रायफल आणि ग्रेनेड सापडल्याप्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

अनंत सिंह यांच्या घरातून एके-47 आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. पोलिसांच्या दाव्यावर खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अनंत सिंह यांना दोषी ठरवण्यात आले आणि आता या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने निर्णय दिला आहे. मोकामाचे आमदार अनंत सिंह सध्या पाटणा येथील बेऊर कारागृहात आहेत.

अनंत सिंह यांनी 2020मध्ये राजदच्या तिकिटावर विधानसभा निवडणक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. परंतु, शस्त्रसाठा प्रकरणात ते सध्या कारागृहात आहेत. बिहारचे बाहुबली समजले जाणारे आमदार अनंत सिंह(MLA Anant Singh) यांच्याविरुद्ध सुरू असलेला हा खटला बिहार सरकारने विशेष प्रकरणांच्या श्रेणीत ठेवला होता. आरोपीविरुद्ध या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आले होते. या खटल्याची जलद सुनावणी करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नियुक्त विशेष सरकारी वकिलांनी 13 पोलिसांना न्यायालयात हजर केले होते. तर दुसरीकडे बचाव पक्षातर्फे अनंत सिंह यांच्या वतीने 33 साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही पक्षांची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली, त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

Smart News:-

दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा धावणार ‘चेन्नई-नगरसोल’ रेल्वे


उद्धव ठाकरे म्हणतात, मी आजच मुख्यमंत्रिपद सोडायला तयार, पण….


एकनाथ शिंदेंसह बंडखोरांना चेकमेट करणारं उद्धव ठाकरेंचं ऐतिहासिक भाषण LIVE


सांगली: सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची घटनास्थळी भेट


Leave a Reply

Your email address will not be published.