‘भाजप जनतेला मूर्ख समजते’, संजय राठोड नेत्याचा घणाघात

नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची (ministership) शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये सर्वाच चर्चेत असणारे नाव संजय राठोड  यांचे आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणाऱ्या राठोड यांना पुन्हा मंत्रीपद (ministership) मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत  यांनी यावरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘भाजप जनतेला मूर्ख समजते’ 
संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी राठोड यांच्या मंत्रिपदाला विरोध दर्शवला आहे. तसेच, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरुन शरसंधान साधताना सावंत म्हणाले की, ‘संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हा शिंदे गटाच्या प्रश्न असे म्हणून आशिष शेलार यांनी हात झटकणे हा भाजपाचा दांभिकपणाचा कळस आहे. मविआ सरकारमधून राजीनामा द्यावा ही मागणी भाजपा नेते एकनाथ शिंदे यांना विचारुन करत होते का? जनतेला भाजपा किती मूर्ख समजते ते दिसून येते,’ असा घणाघात त्यांनी केला.

 

‘शितावरून भाराची परिक्षा…’
यासोबतच सावंत यांनी खातेवाटवारुनही सरकावर टीका केली. ते म्हणतात,’मंत्रीमंडळ विस्तार होऊन 24 तास उलटून गेले. ना विभाग वाटप ना कोणती दिशा. सहयोगी पक्षांची बोंब वेगळीच! शितावरून भाताची परिक्षा जनतेने करावी. भाजपाच्या सत्तेच्या वेडाचे महाराष्ट्रावर दूरगामी दुष्परिणाम होणार हे निश्चित,’ अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. ‘एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही मी त्यांच्याविरुद्धचा माझा लढा सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे और जितेंगे,’ असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Smart News :


Kolhapur Rain: राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले