6 राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा; 7 पैकी 4 जागांवर विजय

won

सहा राज्यांमधील विधासभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पाटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने (won )सर्वाधिक 4 जागा जिंकल्या आहेत. मात्र तेलंगणामध्ये तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाकडून एक जागा हिसकावून घेण्यात भाजपला अपयश आले आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला एक जागा मिळाली आहे, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

भाजपने उत्तर प्रदेशच्या गोला गाकर्णनाथ, बिहारच्या गोपालगंज आणि हरियाणातील आदमपूर येथे विजय मिळवला. ओडिशातील धामनगर येथील जागाही भाजपने जिंकली आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने मोकामाची जागा जिंकली. तर तेलंगणामध्ये मुनुगोडे येथे तेलंगण राष्ट्र समितीचा उमेदवार विजयी झाला. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली जागा राखली आहे. येथे भाजपने उमेदवार मागे घेतला होता(won ).

बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वींचा राष्ट्रीय जनता दल एकत्र आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक झाली. त्यामुळे या दोन जागांकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. बेकायदेशीरपणे बंदुका ठेवण्याबद्दल अपात्र घोषित केले गेलेले राजदचे अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी मोकामात विजयी ठरल्या तर गोपालगंज येथे भाजपच्या कुसुम देवी यांनी राजदच्या मोहन गुप्ता यांचा पराभव केला.

ओडिशात सत्तारूढ बीजू जनता दल आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. त्यात भाजपच्या सेठी यांनी विजय मिळवला. उत्तर प्रदेशातील गोला गोकर्णनाथची जागा भाजपने राखली आहे. हरियाणात माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा गढ मानला जाणाऱ्या आदमपूर येथून त्यांच्याच कुटुंबातील भव्य विश्‍नोई यांनी विजय मिळवला आहे. मात्र भव्य यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपकडून ही निवडणूक जिंकली आहे(won ).

Smart News:-