मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्लीतील मुक्काम वाढला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Chief Minister

बुधवारी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे यांचा एक दिवशीय दिल्ली दौरा नियोजित होता. आणि त्या नंतर दौरा पुर्ण करून बुधवारी ते मुबंईत परतणार होते. परंतु शिंदे यांचा दौरा अचानक वाढल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र एक मुक्काम वाढला असला, तरी गुरुवारी कोणतीही महत्वाची बैठक किंवा चर्चा झाली नाही.

गुरूवारी सकाळी बातम्या येत होत्या की मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister) मोदींना भेटणार आहेत. परंतु या बातम्या शिंदे गटाने फेटाळल्या होत्या. त्यांनी स्पष्ट केलं होत की अशी कोणतीही भेट होणार नाही. गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांशी फोन वरून चर्चा केली आहे.

 

Smart News:-