राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी;आरोग्य विभागाची माहिती

corona patients

पुणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत राज्यात कोरोनाचे निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १.१५ टक्क्यांवरून ०.८९ पर्यंत झाली आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सोमवारी देण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे ७ ते १३ नोव्हेंबर आणि १३ ते २० नोव्हेंबर या दोन आठवड्यांमधील कोरोना उद्रेकाचा आढावा घेण्यात आला. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या या आठवड्यामध्ये एक हजार ३७ पासून ७७३ पर्यंत कमी झाली आहे. म्हणजे राज्यात २५.४६ टक्क्यांनी रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.(corona patients)

राज्यात या आठवड्यात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या आठवड्यातील मृत्यू दर ०.३९ टक्के असल्याचे आरोग्य खात्याने नमूद केले आहे. या आठवडयामध्ये प्रयोगशाळा चाचण्यांची पॉझिटीव्हीटी १.१५ टक्क्यांवरून ०.८९ टक्क्यावर आलेली आहे. पुण्यासह अकोला, कोल्हापूर, जालना आणि सांगली या जिल्ह्यांची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दोनपेक्षा अधिक आहे.

‘आयसीयू’मधील रुग्णसंख्या घटली
रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. या आठवड्यात एकूण दैनंदिन रुग्णांच्या १.५५ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती झालेले आहेत.(corona patients)

‘एक्सबीबी’ व्हेरियंटचे राज्यात १३४ रुग्ण
कोरोनाच्या ‘एक्सबीबी’ या नवीन व्हेरियंटचे राज्यात १३४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७२ रुग्ण एकट्या मुंबईमध्ये आढळले आहेत. त्या खालोखाल पुण्यात या व्हेरियंटचा ४६ रुग्णांना संसर्ग झाल्याचे निदान झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. आतापर्यंत राज्यात ठाण्यात आठ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २, अकोला, अमरावती, रायगड, कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक असे एकूण १३४ ‘एक्सबीबी’ व्हेरियंट सापडले आहेत. या भागात कोरोना प्रसाराचा वेग आणि रोगाची तीव्रता वाढलेली नाही, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

Smart News:-