कपड्यांपर्यंत जावू नका, आम्ही गेलो तर तुम्हाला पश्चाताप होईल; TMCचा भाजपला इशारा

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 41 हजारांहून अधिक किमतीचे ब्रिटीश ब्रँड (British Brand) बर्बेरीचे टी-शर्ट परिधान केल्याने वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावरून भाजप सातत्याने काँग्रेसला घेरत आहे. त्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींवर लाखोंचा सूट घातल्याचा आरोप करत काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला ‘सूट-बूटचे सरकार’ म्हटले होते. या वादात आता तृणमूल काँग्रेसने उडी घेतली आहे.

Smart News:-