“दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण…”; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

Bombay High Court

मुंबई हायकोर्टाच्या (Bombay High Court) निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की, “दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका”

उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे. आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या…वाजत गाजत या…गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका.

Smart News:-