Free Ration : रेशन कार्डधारकांसाठी आंनदाची बातमी, पुढील 6 महिने मोफत मिळणार अन्नधान्य?

केंद्र सरकार (Central Government) सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार सर्वसामांन्याांना गरीब कल्याण अन्न योजनेनुसार (PMGKY) पुढील 6 महिन्यांपर्यंत मोफत रेशन देण्याचा निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारच्या योजनेनुसार सप्टेंबर महिन्यांपर्यंतच मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकार (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) पुढील आणखी 6 महिने मोफत अन्नधान्य वाटप करु शकते. केंद्र सरकार (Central Government) या योजनेला 30 सप्टेंबरपासून पुढे मुदतवाढ देऊ शकते.
3-6 महिन्यांसाठी मुदतवाढीची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सध्या गरिबांना 5 किलो धान्य मोफत पुरवत आहे. तसेच असं मानले जातंय की केंद्र सरकार या योजनेला पुढील 3 ते 6 महिन्यांसाठी मुदतवाढ देऊ शकते. दरम्यान या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर $10 अब्ज इतका भार पडू शकतो.
अधिकारी काय म्हणाले?
“सरकारचा मोफत रेशन योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, यासंदर्भात निर्णय कधी घेतला जाणार याबाबत अधिकृत माहिती नाही” अशी प्रतिक्रिया अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी दिली. या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मार्च 2020 पासून मोफत रेशन देण्यास सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्यात आलं.
सरकारकडून लोकांना दरमहा 5 किलो मोफत रेशन दिलं जातं. सध्या या योजनेला सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली असून ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार सर्वसामांन्यांना दिलासा देणारा निर्णय घेणार का, याकडे सर्व रेशनधारकांचं लक्ष असणार आहे.