व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

economic development

द्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस लागल्यामुळे बेरोजगारी दूर व्हायला मदत झाली. तरुण पिढी कल्पकतेने नवीन उद्योग धंदे सुरु करत आहे(economic development).

त्यांना उद्योग चालू करण्यास सुरुवातीला कर्जाची गरज पडते.

बरेचसे स्टार्टअप व्यावसायिक कर्ज घेऊन उद्योगाला सुरुवात करतात, कारण सर्वच उद्योगांना निधी मिळत नाही. अशावेळेला शून्यातून उद्योग उभा करणे हा पर्याय समोर उभा राहतो(economic development). उद्योग करताना आधी पैशांची गुंतवणूक करावी लागते आणि काही काळानंतर व्यवसायातून परतावा मिळतो.

उद्योजकाने एखादी सेवा किंवा प्रोडाक्ट्ची ग्राहकाला विक्री केल्यावर त्याची कमाई चालू होते. उद्योगातून मिळणाऱ्या पैशांनी उद्योजकाला त्याची स्वप्ने पूर्ण करता येतात. अनेक उद्योगांना त्यांचे व्यवसाय वाढवताना अडचणींना सामोरे जावे लागते.

तुम्हाला माहितेय का, त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल? उद्योजकाने जे नियोजन केलेले असते त्यासाठी त्यांना भांडवल कमी पडत असते. पण उद्योजक ही समस्या खालील मार्गानी थांबवू शकतात. व्यवसायात योजना राबवण्यासाठी उद्योजकांना पैशांची अडचण भासत असते.

भारतामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी कर्ज उपलब्ध आहेत.

व्यावसायिक कर्ज घेण्याच्या आधी खालील मुद्दे समजून घ्या –

छोट्या उद्योगासाठी कर्ज घ्यायचे असेल तर खालील मुद्दे लक्षात घ्या(economic development).

१. कर्जाचा आकार Loan Size –

 • कर्ज घेत असताना कर्जदाराला किती रुपयांचे कर्ज हवे आहे हे माहित असणे गरजेचे असते. किती रुपयांची गरज आहे, कर्ज घेण्यासाठी लागणारा खर्च आणि इतर खर्च मिळून किती रुपये लागतील याचा योग्य पद्धतीने अभ्यास करायला हवा.
 • कर्जदार हा कायम बँकेत जाऊन लघु, सूक्ष्म आणि मध्यम व्यवसाय कर्ज घेऊ शकत नाही, त्यामुळे त्याने एकदाच विचार करून हवे असलेले कर्ज घ्यावे.
 • यावेळी हे लक्षात ठेवायला हवे की मोठे कर्ज घेतले तर त्यावर व्याजदर जास्त पडू शकतो. त्यामुळे कर्ज घेताना हप्ते फेडता येतील एवढेच घ्यावे.

२. कर्जाच्या गरजेचे मूल्यांकन करा –

 • जर कर्जदाराला सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारातील कर्ज हवे असेल तर त्याला कमी कालावधीसाठी कर्ज मिळू शकते.
 • गरजेच्या वेळेला कमी व्याजदर असणाऱ्या बँका शोधायला वेळ नसतो .(economic development)

 

३. कर्ज करार काळजीपूर्वक वाचा –

 • कर्ज कराराचे काळजीपूर्वक वाचन करणे ही कर्जदाराची जबाबदारी असते. प्रत्येक कागदपत्राची माहिती समजून घेणे आणि काही अडचण आल्यास रिलेशनशिप मॅनेजर बरोबर संवाद साधने हे कर्जदाराचे महत्वाचे काम आहे.
 • खेळत्या भांडवलातील कर्जाच्या सर्व अटी कर्जदाराने समजावून घ्याव्यात.

४. कंपनीची क्रेडिट योग्यता जाणून घेणे –

 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारातील आणि बँकेकडून कोणतेही कर्ज घेण्याच्या आधी आपल्या कंपनीची क्रेडिट योग्यता कर्जदाराने जाणून घ्यायला हवी.
 • क्रेडिट योग्यता कमी असेल तर बँकेकडून कर्ज नाकारले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे कंपनीला भविष्यात कर्ज मिळू शकत नाही.
 • पण जर क्रेडिट योग्यता चांगली असेल तर बँकेला कमी व्याजदरात कर्ज द्यायला कर्जदार भाग पाडू शकतो. त्यानंतर त्याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यावसायिक कर्ज मिळू शकते.

कर्ज घेतल्यावर मिळणारे फायदे :

१. योग्य कालावधी –

 • कर्जदारांना त्यांच्या नफा आणि खेळत्या भांडवलाच्या गरजेनुसार कर्जाचे हप्ते भरण्याची परवानगी बँक देत असते.
 • कर्जदार म्हणून कमी कालावधीसाठी कर्ज हवे असेल तर तसा किंवा तुम्हाला जर जास्त कालावधीसाठी कर्ज हवे असेल तर ८ ते १० वर्षाचा कालावधी कर्जफेडीसाठी मिळतो(economic development).

२. पैसे वापरण्याचे स्वातंत्र्य –

 • स्टार्टअप म्हणून एखाद्या उद्यम भांडवलदार गुंतवणूकदाराशी संपर्क साधला आणि त्यांनी तुमच्या व्यावसायिक कल्पनेला निधी देण्याचे मान्य केले तर व्यावसायिक बाबींमध्ये त्यांचा हस्तक्षेप होतो.
 • तेच जर बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले तर व्यवसायात पैसे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. फक्त त्या कर्जाची वेळेवर परतफेड करावी लागते.

३. कागदपत्रांची सोपी प्रक्रिया –

 • सध्याच्या काळात कर्जाच्या अर्जापासून ते त्याच्या परतफेडीपर्यंत सर्व काही ऑनलाइनच करावे लागते. कर्जदाराला कायम बँकेच्या शाखेत जाऊन भेटी द्याव्या लागत नाहीत.
 • ऑफिसमध्ये बसून कर्जदार सूक्ष्म, लघु आणि मध्यम कर्जासाठी अर्ज करू शकतो.
 • ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता करावी लागते.

४. कमी व्याजदर Low Interest –

 • बँकांनी उद्योजकतेला चालना देण्यासाठी लक्ष केंद्रित केल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम प्रकारातील कर्जाचे व्याजदर कमी झालेले आहेत.
 • कंपनीच्या क्रेडिट प्रोफाइल आणि कर्जदारानुसार व्याजदर बदलत असतात.

५. नफा वाटप करार नसणे :

 • उद्यम भांडवल गुंतवणूकदार म्हणजे व्हेंचर कॅपिटल फ़ंड सहामाही आणि वार्षिक नफ्यातील हिश्यामधील पैसे मिळतील म्हणून निधी देत असतात.
 • पण बँकेतून कर्ज घेत असताना असा कोणताच तुमच्या नफ्यातील हिस्सा मागितला जात नाही.
 • फक्त कर्जदाराला महिन्याला ठरलेल्या रकमेचा ईएमआय भरावा लागतो.(economic development)

 

६. असुरक्षित कर्ज –

 • असुरक्षित कर्ज अशी कर्ज असतात जी घेत असताना कर्जदाराला कोणत्याही प्रकारची मालमत्ता बँकेला तारण ठेवावी लागत नाही.
 • उद्योग सुरु करताना अनेक स्टार्टअप आणि छोट्या कंपन्यांकडे तारण ठेवायला मालमत्ता नसते.

७. जलद मंजुरी आणि वितरण –

 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम विभागाकडे कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून उद्योगाच्या संदर्भातील कागदपत्रे पाठवली की त्यानंतर बँक तुमचा फॉर्म तपासून पाहते आणि त्याच दिवशी कर्ज मिळेल का नाही हेही कळवले जाते.
 • कर्जदाराला उद्योगासाठी अचानक पैसे हवे असतील तर त्याच्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम विभागाकडून कर्ज घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

८. कमी क्रेडिट स्कोअरवर कर्ज –

 • कर्जदाराच्या व्यवसायाची क्रेडिट योग्यता कमी असल्यास कार्यरत भांडवल कर्जासाठी तो अर्ज करू शकतो.
 • अनेक नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपन्या क्रेडिट लोन ऑफर करतात.
 • तिथून कर्ज घेऊन वेळेवर हप्ते भरले तर तुमचा क्रेडिट इतिहास सुधारायला मदत मिळते(economic development).

Smart News:-