एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला.

आपण औरंगाबादला संभाजीनगरच म्हणत आलो असल्याचं ते म्हणाले. अकबरुद्दीन औवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान औरंगजेबच्या कबरीवर फुलं अर्पण केले होते. त्यांच्या या वागणुकीवर राज्यभरातून टीका केली जात होती. औवेसींच्या या कृत्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी देखील घेत शाब्दिक निशाणा साधला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? “संभाजीनगरमध्ये जे काही घडलं. हो मी संभाजीनगर म्हणतो. आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो औवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं ठेवून आला.

हे यांचं जे काही चाललं आहे, यांची ए, बी, सी टीम, कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कुणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायची आणि मजा भगायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार आम्ही बोंबलायला वेगळे. आम्ही जाणार टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य.

बरं सुरक्षा किती? झेड प्लस”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी(Chief Minister Uddhav Thackeray) टीका केली. “आज महागाई किती वाढली आहे. 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते.

पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? तुम्ही सांगता ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. मग इथे कोण आहे?

ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींची राहिला आहे का?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. “आपण खोटू बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदूत्वात बसू शकतं. पण आपल्या हिंदूत्वात बसू शकत नाही.

राहूल भटला सरकारी कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या आहेत. अतिरेकी येतात, महसूल कार्यालयात घुसून नाव विचारत गोळ्या झाडत आहेत. काश्मिरी पंडीत म्हणत आहेत की आमचा बळीचा बकरा बनवला जात आहे. उज्ज्वला योजना काढली होती.

पण गॅसचे भाव कुठे गेले? लाज नाही, लज्जा नाही. लोकांना भ्रमिष्ठ करुन आपला कारभार करत राहतात”, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. ‘आम्ही गाढवांना लाथ मारुन सोडलं’ “नेमकं कशावर बोलायचं हा मुद्दा असला तरी हल्ली विशेषत: सर्व पक्ष त्यातही हिंदुत्वाचा खोटा बुर्खा घातलेला एक पक्ष आपल्यासोबत होता ते देशाची दिशा भरकवटत आहेत.

मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो. आमचं हिंदूत्व कसं आहे ते शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे.

तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचं हिंदूत्व हे गदाधारी आणि बाकीच्यांचं हिदूत्व हे गदाधारी आहे. बसा बडवत. काय मिळालं?

घंटा! हे बघा तो गदा हलवतोय (प्रेक्षकांकडे बघून). अहो गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम!

त्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं.

आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल. आम्ही त्या गद्याला सोडून दिलं आहे. कारण त्याचा उपयोग नाही. शेवटी उपयोग काय त्याचा? गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्यामुळे जी गाढवं घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती त्या गाढवांनी लाथ मारण्याआधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत. आता बसा काय करायचंय ते”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Smart News:-

कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर


‘वाय’ नक्की आहे तरी काय?


IPL सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगचा थेट पाकिस्तानशी संबंध! CBI तपासात 3 जणांना अटक


आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय


Leave a Reply

Your email address will not be published.