शपथविधी सोहळ्यात खर्गेंना नाही मिळाली योग्य जागा; विरोधकांचा सरकारवर आरोप

President

संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपतिपदाची(President) शपथ घेतली. मात्र, त्यावेळी बसण्याच्या जागेवरून वेगळेच मानपान रंगले आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे नाराजी नोंदवली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संबंधात हा प्रकार घडला आहे.

पंतप्रधान, उपराष्ट्रपती (Vice President), लोकसभा अध्यक्ष, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा, अनेक केंद्रीय मंत्री सोहळ्याला उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.

मात्र, त्यांची ज्येष्ठता आणि मोठ्या विरोधी पक्षाचे नेते म्हणून असलेल्या पदानुरूप त्यांना जागा देण्यात आली नाही. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. जयराम रमेश या कॉंग्रेस नेत्यांनी राज्यसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Smart News:-

‘चुकीच्या कामाचे समर्थन करणार नाही; मग जन्मठेपेची शिक्षा झाली तरी चालेल’: ममता बॅनर्जी


सामूहिक बलात्कारप्रकरणी माजी आमदार पुत्राला पुण्यातून अटक;


वजन कमी करायचंय? तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश


देशाच्या घटनेला संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव- मुझफ्फर हुसैन


‘फ्युजन आवडत नाही… ‘ विरोध करणाऱ्यांना राहुल देशपांडे यांनी सुनावले


 

Leave a Reply

Your email address will not be published.