कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी शिवसेना तालुक्याच्या वतीने जोडे मारो निदर्शने

शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापुरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या(latest political news) वतीने जोडे मारो तीव्र निदर्शन करत त्यांच्या निषेदाच्या  घोषणा देत आज मलकापूर येथे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी शिवसेना तालुक्याच्या वतीने जोडे मारो निदर्शने करण्यात आली.

यावेळी बोलताना शिवसेना (latest political news)तालुकाध्यक्ष दत्ता पवार म्हणाले, मराठा समाजाविषयी आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांना शिवसैनिक  जिल्ह्यात फिरू देणार  नाहीत. घराचे वासे  मोजणारे ही गरळ ओकणारी  गद्दार औलाद आहे .तर यावेळी बोलताना उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार म्हणाले ,अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या मराठ्यांचा इतिहास तानाजी सावंत यांना माहिती नाही अशा गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही.

यावेळी  योगेश कुलकर्णी म्हणाले, भाजपच्या आडून शिवसेना संपवण्याचा डाव  कधीच यशस्वी होणार नाही हा शिंदे गट नसून मिंदे गट आहे.  हे सर्व भाजपच्या अडून कारस्थान सुरू आहे. यावेळी विनायक कुंभार ,जयसिंग डाकवे, विजय लाटकर, पांडुरंग कारंडे ,निवास कदम,  सतीश तेली, विठ्ठल खोत, अनिल पाटील, नामदेव खोत, दिग्विजय कुंभार, तानाजी पवार, सौ पुनम भोसले  आधी शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :