मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, मुहूर्तही ठरला, शिंदेंच्या आमदाराने दिली Update

एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूनला घेतली, त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. तसंच मी नेहमी खूश असतो, मंत्रिमंडळ यादीत नाव असो किंवा नसो. कारण मी उधारीवर धंदा करत नाही. मैने नगद बेचा मुझे टेन्शन नही, असं उत्तर सत्तार यांनी मंत्रीपदी तुमची वर्णी लागणार का, या प्रश्नावर दिलं.
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मातोश्रीची दारं गेलेल्या आमदारांसाठी अजूनही उघडी असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावरही सत्तार बोलले. मातोश्रीची दारं उघडी असली तरी मी आता परत जाणार नाही, असं सत्तार यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शनाला 31 जुलैला उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) 31 तारखेला सिल्लोडमध्ये येणार असल्याचं सत्तार यांनी जाहीर केलं.
एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? अजित पवारांचा कडाडून हल्लाबोल
सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा राष्ट्रकुलपूर्वी छळ
‘आम्ही चिरफाड केली तर माफीवीरापासून सर्व बाहेर निघेल’; काँग्रेसचा थेट इशारा
कोल्हापूर : खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे