मी फिक्स मॅच बघत नाही, लाइव्ह मॅच बघतो;

मी फिक्स मॅच बघत नाही, लाइव्ह मॅच बघतो. ठाकरेंची मुलाखत ही फिक्स होती. (maharashtra political news today) असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. आज शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यादरम्यान त्यांनी बंडखोरांवर हल्ला चढवला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील ओला दुष्काळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहण्यात करण्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांना मदत पुरवणार असल्याचे अश्वासनही यावेळी दिले. (maharashtra political news today) काँग्रेच्या आंदेलनाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नसून, मागच्या सरकारपेक्षाही आम्ही चांगले काम करू, असा चिमटादेखील त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना काढला.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची ही मुलाखत घेतली असून त्याचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यात उद्धव ठाकरेंनी राज्यातील सरकार कसे पाडले याबाबत भाष्य करत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी इस्पितळात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले!” असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही ती गळून पडताहेत. आणि हे बघा, झाड कसं उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करताहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला आहे.

हेही वाचा :


कोल्हापूर : राऊतवाडी धबधब्यावर २२ हुल्लडबाजांवर कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published.