भाजपला चार राज्यांत 176 जागांवर घेरणार, ममता बॅनर्जींचा मेगा प्लॅन

2024

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत भाजपला चार राज्यांत 176 जागांवर(176 seats) घेरण्याचा मेगा प्लॅन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तयार केला आहे. या रणनीतीनुसार भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, जनता दल संयुक्तचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते-मुख्यमंत्री हेमंत सोरेने एकत्र येऊ असेही त्यांनी जाहीर केले.

 

ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला जोरदार टक्कर देणार म्हटले आहे. 2024 मध्ये पुन्हा एकदा ‘खेलो होबे’ होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80, बिहारमध्ये 40, पश्चिम बंगालमध्ये 40 आणि झारखंडमध्ये 14 अशा एकूण 176 जागा(176 seats) आहेत. या मोहिमेत इतर पक्षांनाही सहभागी करून घेणार असल्याने भाजपला नक्कीच आव्हान निर्माण करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सद्यस्थितीत या चार राज्यांतील जागांमध्ये भाजपकडे सध्या 109 जागा आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये 64, बिहार 17, झारखंडमध्ये 11 तर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे 17 खासदार आहेत.

अहंकारच त्यांना धडा शिकवेल!

मागच्या लोकसभा निवडणुकीत भापजला 300 जागा मिळाल्याने अहंकार झाला आहे. मात्र हा अहंकार आणि मतदारांचा रागच त्यांना धडा शिकवेल, पराभूत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नितीशकुमार, हेमंत सोरेन यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून भाजपला थेट आव्हान निर्माण करू. आम्ही सर्व एका बाजूला असून आणि भाजप एका बाजूला, असे सांगताना बंगालच्या निवडणुकीत ‘खेलो होबे’ म्हणत तृणमूल काँग्रेसने भाजपच्या केलेल्या पराभवाप्रमाणे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीतही भाजपचा पराभव होईल, असे त्या म्हणाल्या.

Smart News:-