राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ तरीही मनसे नाराज; काय आहे कारण?

Raj Thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांची वाय दर्जाची सुरक्षा कायम ठेवून त्यांच्या सुरक्षेत एक पोलीस अधिकारी आणि एक अंमलदार यांची वाढ करण्यात आली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारने चालविलेली ही थट्टा आहे, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.

आम्ही मागणी काय करतो आणि सरकार काय संरक्षण देते कळत नाही. राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मी तक्रारदेखील केली. असे असताना सुरक्षेत केवळ दोन कर्मचाऱ्यांची वाढ करून वाटाण्याच्या अक्षता लावत आहे, अशी टीका नांदगावकर यांनी केली. राज ठाकरे(Raj Thackeray) यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राकडून फार मोठी अपेक्षा नाहीच; पण राज्य सरकारही गंभीर दिसत नाही, असेही ते म्हणाले.

 

Smart News:-

चिंब भिजण्यास तयार रहा! मान्सून… कमिंग सून; सहा दिवस आधीच राज्यात दाखल होणार


पैसे नसल्याने बेघर झालेला तरुण; अचानक जुन्या बँक अकाऊंटबद्दल समजलं अन् आयुष्यच बदललं


कोणत्या अभिनेत्रीमुळे ‘सोहेल – सीमाच्या’ संसाराला गालबोट?, घटस्फोटाची तयारी


चंद्रावरून आणलेल्या मातीत उगवले रोपटे


पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद


 

Leave a Reply

Your email address will not be published.