मुंबईचा बाप शिवसेना, तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे : संजय राऊत

Shiv Sena

शिवसेना(Shiv Sena) कोणापुढे वाकणार नाही, ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. मुंबईचा बाप फक्त शिवसेना आहे.

आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे वक्तव्य शिवसेना(Shiv Sena) नेते संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबईतील वांद्रे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोज करण्यात आले आहे. यावेळी संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “प्राण गेला तरी चालेल पण शिवसेना(Shiv Sena) हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही. औरंगजेबचा जन्म गुरजातमधील दोहाड गावात झाला आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात गाडला. महाराष्ट्रावर सातत्याने आक्रमने का होतात हे आता कळेल. औरंगजेब गुजरातमध्ये आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले हा खरा संघर्ष आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भोगलं ते आज आपण भोगतोय त्याची मूळं गुजरातच्या दोहाड गावात आहेत.

अकबरूद्दीन ओवैसीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमाना केला आहे. औवेसीने 2014 पासून अनेक वेळा औरंगजेबाच्या समाधीपुढे गुडघे टेकले आहेत. परंतु, त्याच्यावर कोणी कारवाई केली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

“आज काश्मीरमधील हिंदू सर्वात जास्त धोक्यात आहे. गेल्या तीन महिन्यात काश्मीरमध्ये 27 काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. काल राहुल भट्ट या काश्मीरी पंडिताची हत्या झाली. त्यामुळे आज तेथील नागरिक याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले तर केंद्र सरकारच्या पोलिसांनी त्यांच्यावर अश्रू धुराच्या नाळकांड्या फोडल्या. शिवसेनेवर बोटे दाखवू नका, नाही तर शाहिस्तेखानाप्रमाणे तुमची बोटे छाटू, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.

Smart News:-

हार्दिक पांड्याला लागणार कर्णधारपदाची लॉटरी! रोहित-विराटसह बड्या खेळाडूंना मिळणार विश्रांती


एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा


आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला


कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केले एव्हरेस्ट शिखर


‘वाय’ नक्की आहे तरी काय?


 

Leave a Reply

Your email address will not be published.