Navale Bridge Accident : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 26 वाहनांना उडविले

high-speed

पुणे, धायरी : साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.(high-speed)

कायम अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) अशी ओळख असलेल्या नवले पुलाचा परिसर रविवारी रात्री पुन्हा एकदा हादरला. रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा ब्रेक अचानक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या २४ वाहनांना उडविले. ही वाहने एकमेकांना धडकल्याने रस्त्यावर, रस्त्याच्या बाहेर फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या कारचाही अक्षरशः चक्काचूर झाला होता.(high-speed)

अपघातग्रस्तांना वाचविण्यासाठी धडपड
या अपघातात एक रिक्षा व २३ कारचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर वाहने रस्त्यांवर इतरत्र पडले होते. त्यामध्ये चालक, सहप्रवासी, प्रवासी अडकून पडले आहेत का?, याचा शोध घेत रस्त्याने जाणारे वाटसरू, स्थानिक नागरिक, प्रवासी, आजूबाजूचे व्यावसायिक, अग्निशामक दल, वाहतूक शाखा, सिंहगड रोड व दत्तवाडी पोलिस घटनास्थळी मदतीला धावून आले. त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्यांना तत्काळ बाहेर काढून त्यांना तेथे आलेल्या ८ ते १० रुग्णवाहिकांतून उपचारांसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत होते.

रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी
अपघातामुळे साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली. नवले पुलापासून पाठीमागे कात्रज नवीन बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात वाहने अडकल्याने नागरिकांनी खासगी वाहने करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मुंबई, गुजरात व उत्तर भारतात जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला.

अवघ्या 2 तासात 3 मोठे अपघात, दुचाकीस्वार तरुणाचा

ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने केलेल्या अपघातातील वाहने रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर आणखीन एका कंटेनरने दोन चार चाकी गाड्यांना उडवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघातामुळे वाहतूक कोंडी गंभीर झाली होती.त्याचवेळी रात्री 10.20 वाजता भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कात्रज नवीन बोगदा ते दरी पुल येथे आणखी एक अपघात झाला. या अपघातात यात एका चारचाकीने समोरून जाणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.(high-speed)

” अपघात घडला त्यावेळी मी तेथेच होतो, अपघात ग्रस्त नागरिकांना मदत केली. परंतु, इथे वारंवार अपघात होऊनही ठोस उपाययोजना होत नाहीत. स्पीडगन कॅमेरे लावले, परंतु त्यातून केवळ शासनाच्या उत्पन्नात वाढ झाली, मात्र अपघात कमी होतील, असा कुठलाही प्रयत्न झालेला नाही.”

तीव्र उतार ठरतोय जीवघेणा

कात्रज नवीन बोगदा संपल्यानंतर दरी पुलापासून महामार्गावर तीव्र उतार सुरू होतो. या उतारावरून येताना वाहनचालक डिझेल वाचविण्यासाठी वाहने बंद तीव्र उतारावरून भरधाव येतात. उतार संपल्यानंतर अनेकदा वाहनांना ब्रेक लागत नाही, त्याचवेळी अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागत असल्याची सद्यस्थिती आहे.

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी दखल घेतली आहे. आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत

Smart News:-