आता SC/ST, ओबीसींना काँग्रेसमध्ये मिळणार 50% आरक्षण, चिंतन शिबिरात घेण्यात आला मोठा निर्णय

Reservations

आता काँग्रेसमध्ये एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षण(Reservations) असेल, असा निर्णय राजस्थानातील उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या तिन दिवसीय चिंतन शिबिरात घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील एक मोठा वर्ग गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष संघटनेत एससी/एसटी आणि ओबीसी समाजासाठी 50 टक्के आरक्षणाची मागणी करत होता.

चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे नेते के राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणासाठी पक्षात संघटनात्मक बदलांना मान्यता देण्यात आली आहे. एवढेच नाही, तर सामाजिक न्याय आणि सशक्तिकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कमिटीने आरक्षणाच्या(Reservations) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर हा प्रस्ताव सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Smart News:-

शरद पवारांवर आक्षेपार्ह कविता, भाजप प्रवक्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चोप, घटना कॅमेऱ्यात कैद


जतमधील सोरडीत पॅरोलवर आलेल्या आरोपीची आत्महत्या, जन्मठेपेची भोगत होता शिक्षा


सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात


केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…


Leave a Reply

Your email address will not be published.