शरद पवारांवर आक्षेपार्ह कविता, भाजप प्रवक्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चोप, घटना कॅमेऱ्यात कैद

Facebook
मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे.
शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेवर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. केतकी चितळे हिने फेसबुकवर (Facebook) एक कविता शेअर करत शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. विशेष म्हणजे तिच्याआधी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनीदेखील फेसबुकवर शरद पवारांवर टोकाची टीका केली होती. केतकी चितळेच्या टीकेचं प्रकरण गाजलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज विनायक आंबेकर यांना मारहाण केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी तिथे आंबेकर यांना त्यांच्या फेसबुक(Facebook) पोस्टबाबत जाब विचारला. यावेळी आंबेकर आपली भूमिका मांडत होते. पण आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. आंबेकर यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही शेअर केला जातोय. आंबेकर यांना करण्यात आलेल्या मारहाणीवर आता भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

केतकी चितळेला अखेर अटक दरम्यान, शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका करणाऱ्या केतकी चितळेवर अखेर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

केतकी विरोधात ठाण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिला नवी मुंबईत ताब्यात घेतलं. कळंबोली पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला ठाणे पोलिसांच्या स्वाधिक करण्यात आलं. केतकीला आता उद्या ठाणे कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Smart News:-

सावधान! आधार कार्डचा गैरवापर करून परस्पर उचलले कर्ज, वसुलीसाठी बँक अधिकारी आले दारात


केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…


शिवसेनेच्या हायव्होल्टेज सभेसाठी बीकेसीत जनसागर, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर कोण?


त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री होणारे माणिक साहा कोण आहेत?


Leave a Reply

Your email address will not be published.