महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात लवकरच सत्तांतर; भाजपचे 16 आमदार फुटणार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी शिवसेनेतील  आत्तापर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी ठरलीय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. (political news today) एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. त्यातच भाजपनं ऑपरेशन लोटसद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे आमदार फोडत सत्ता मिळवलीय. (political news today) महाराष्ट्रातील सत्ता मिळवल्यानंतर भाजपच्या निशाण्यावर झारखंड  राज्य असल्याचं बोललं जातंय.

झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस  होईल, असं एका भाजप नेत्यानं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, झारखंड मुक्ती मोर्चाचे  सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य  यांनी भाजपला धक्का देणारं वक्तव्य केलंय. झारखंडमधील भाजपचे (Jharkhand BJP) 16 आमदार आमच्या संपर्कात असून ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असं वक्तव्य भट्टाचार्य यांनी केलंय.

भट्टाचार्यांच्या वक्तव्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. सुप्रियो भट्टाचार्य यांनी राज्यातील भाजपचे 16 आमदार अस्वस्थ आहेत, त्यामुळं ते झारखंड मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात. सुप्रियो यांच्या मते भाजपचे 16 आमदार वेगळा गट स्थापन करुन सोरेन सरकारला पाठिंबा देऊ शकतात.

आमचा पक्ष 16 आमदारांच्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. झारखंडमध्ये भाजपचे 26 आमदार आहेत. मात्र, भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव  यांनी सुप्रियो भट्टाचार्य यांचा दावा फेटाळून लावलाय. हेमंत सोरेन यांचा पक्ष त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे. खोट्या गोष्टी सांगून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं शाहदेव यांनी म्हटलंय.

हेही वाचा :


कोल्हापूर :सरकारी रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे मृतदेह सडला!

Leave a Reply

Your email address will not be published.