देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह ‘खंजीर’ मिळो;ठाकरेंना चिमटे

राज्यातील राजकीय बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. (political news update) यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक टिकेदरम्यान पाठीत खंजीर खूपसल्याचे म्हटले. या दोघांच्याही या शब्दावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना मिश्किल चिमटा काढत देव करो तुम्हाला पुढचं बोधचिन्ह खंजिरच मिळो अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मुनगंटीवर म्हणाले की, महाराष्ट्र तोडणार हे वाक्य खूप जुने झाले असून, अशा प्रकरची वाक्यं केवळ आणि केवळ सहानुभूती घेण्यासाठी बोलली जात आहेत. (political news update) मुंबई तोडण्याचे महापाप तर काँग्रेसचेच असून, तुम्ही अजुनही काँग्रेसच्या मांडीवर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीबाबत ते म्हणाले की, ही मुलाखत पारिवारिक होती. तसेच हा एका हताश झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांकडून जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेला असफल प्रयत्न आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपा तसंच बंडखोर आमदारांवर सडेतोड टीका केली आहे. सडलेला पालापाचोळा आहे, जो आत्ता पडतोय, तो एकदा शांत झाला की सगळं सत्य समोर येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांना पालापाचोळा म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा :


आंदोलन राहुल गांधींचे ;चर्चा काँग्रेसने ट्विट केलेल्‍या ‘त्‍या’ फोटोची

Leave a Reply

Your email address will not be published.