एकच धून… 6 जून… चलो रायगड, संभाजी छत्रपती मौन सोडणार?

रायगडावर येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक  सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अत्यंत देखणा आणि दिमाखदार करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीनं जोरदार तयारी सुरू आहे. (political today news) या सोहळ्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी यंदा रायगडावर  जमणार आहेत. या सोहळ्यासाठी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपतीही  उपस्थित राहणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संभाजी छत्रपती यांना तिकीट मिळालं नव्हतं. त्यावरून राजकीय नाट्यही घडलं होतं. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती रायगडाच्या पायथ्याला नवीन घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किल्ल्यावर ते कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करणार नाहीत. पण रायगडाच्या पायथ्याला ते राजकीय भूमिका मांडू शकतात. त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने संभाजी छत्रपती 6 जून रोजी मौन सोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(political today news)

राज्यसभेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच संभाजी छत्रपती रायगडावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर ते रायगडाच्या पायथ्यावर आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्याचे संकेत आहेत. यावेळी ते स्वराज्य पक्षाच्या वाढीच्या अनुषंगाने काही घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा उभारण्याबाबतही त्यांच्याकडून काही घोषणा केली जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राऊत-श्रीमंत शाहू महाराजांच्या भेटीवर बोलणार?
गेल्या आठवड्यात शिवसेना नेते संजय राऊत हे कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी संभाजी छत्रपती यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यावरही संभाजी छत्रपती काही भाष्य करणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तसेच राज्यसभेच्या तिकीटावरून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या विधानाचाही ते समाचार घेणार का? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.

एकच धून, 6 जून
दरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्ताने एक प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. ऐका…! एकच धून… 6 जून… चलो रायगड, असं टायटल देऊन हा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 54 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत एक जीन्स घातलेला तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा दिसत आहे. हा तरुण सेल्फी काढताना दिसत आहे. ते पाहून मावळा त्याला उठाबशा काढायला लावतो. त्यानंतर हा तरुण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन वर जाण्याचा बेत आखताना दिसत आहे. तिथेही मावळा येतो आणि त्याला उठाबशा काढायला सांगतो. एकही संवाद नसलेल्या या व्हिडीओत बॅकग्राऊंडला ढोलताशा वाजवण्यात आला आहे.

हेही वाचा :


राज्यात दारूची होम डिलिव्हरीवर बंद होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *