‘चांगलं काम झालं नाही तर डोकं फोडेन’,अधिकाऱ्यांना सज्जड दम

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांची एक दबंग नेता म्हणून ओळख आहे. यादरम्यान, त्यांचा सरकारी अधिकाऱ्यांना दम दिल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ‘तुमच्याकडून एक रूपयाही घेत नाही, (politics) तुम्ही चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर डोके फोडेन, लक्षात ठेवा’, अशा शब्दात माजी मंत्री आणि तिवसाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दम दिला आहे.

तिवसा तालुक्यातील एका रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यशोमती ठाकूर यांनी हा इशारा दिला आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आटोपल्यावर यशोमती ठाकूर या संबंधित रस्त्याचे काम कुणाकडे आहे, (politics) असं विचारणा केली असता तेव्हा एक अधिकारी कनिष्ठ अभियंता म्हणून आपली ओळख सांगतो आणि हे काम आपल्याकडे आहे, असं सांगतो.

त्याचवेळी अधिकाऱ्यांना उद्देशून यशोमती ठाकूर या रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड स्वीकारली जाणार नाही, असं सांगतात. ‘मी एक रूपयाही घेत नाही, तुमच्याकडून क्वालिटीचे काम झाले नाही तर डोकं फोडीन लक्षात ठेवा’, असा इशारा त्या यावेळी देताना दिसत आहेत.

हेही वाचा :


तलावात पोहताना तलाठ्याचा बुडून मृत्यू !

Leave a Reply

Your email address will not be published.