गुजरातमध्ये सात नेत्यांचे भाजपकडून निलंबन

assembly elections

अहमदाबाद : गुजरातेतील विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या सात नेत्यांना भाजपने निलंबित केले. यात दोन माजी आमदारांचाही समावेश आहे. या सर्वजणांनी येत्या एक डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरले होते.(assembly elections)

यापूर्वी २०१२ मध्ये माजी आमदार अरविंद लाडानी यांनी केशोड मतदारसंघातून तर हर्षद वसावा यांनी नांदोड मतदारसंघातून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित नांदोड मतदारसंघातून विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपने नांदोडमधून डॉ. दर्शना देशमुख आणि केशोडमधून देवभाई मालम यांना तिकीट दिले आहे.(assembly elections)

त्यामुळे, लाडानी आणि वसावा यांनी या मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरले. या दोघांशिवाय भाजपने सुरेंद्रनगरचे जिल्हा पंचायत सदस्य छत्तरसिंह गुंजारिया यांनाही निलंबित केले आहे. त्यांनी धरणगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. याशिवाय इतर निलंबित नेत्यांमध्ये केतन पटेल, भारत चवडा, करण बरैय्या आदींचाही समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे पार्डी, राजकोट, वेरावळ, राजौला मतदारसंघातून अर्ज भरले आहेत.

या नेत्यांनी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरल्याने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या आदेशावरून भाजपमधून निलंबित करण्यात येत आहे, असे भाजपच्या निवेदनात म्हटले आहे. या नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांच्यावर कारवाईचा इशारा पाटील यांनी दिला होता.

तिकीटवाटपावरून असंतोष

गुजरातेतील अनेक भाजप नेत्यांमध्ये तिकीट नाकारल्याने असंतोष पसरला असून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. वाघोडिया मतदारसंघातून सहावेळा आमदार झालेले मधु श्रीवास्तव यांनीही भाजपने तिकीट न दिल्याने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे, भाजपचे माजी आमदार दिनेश पटेल हेही पाडरामधून अपक्ष उमेदवार आहेत.

Smart News:-