राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

NCP

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत पवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष असून, त्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील चार वर्षे असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) दिल्लीत झालेल्या कार्यकारिणीत शरद पवारांची पक्षाध्यक्षपदी निवड करण्यात आली. 1999 मध्ये काँग्रेसमधून फारकत घेऊन पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तेंव्हापासून सातत्याने पवारच पक्षाची धुरा सांभाळत आहेत. आज प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या निवडीवर मोहोर उमटविण्यात आली.

लोकसभानिवडणुकीच्यादृष्टीनेमहत्त्वाचीभूमिका

भाजपाविरोधात सक्षम राजकीय आघाडी उभी करण्यासाठी शरद पवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षातर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आणले जात आहे. नितीशकुमारांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने पवारांची राजकीय भूमिकाही महत्वाची राहणार आहे.

Smart News:-