रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी

Smart News:- रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा नामंजूर; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी

Smart News:-  “ग्लोबल टीचर’ विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे. प्रशासकीय कारणामुळे डिसले यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर दोन वर्ष गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यासंदर्भात त्यांच्यावर चौकशी समिती देखील गठीत केली होती. या समितीच्या अहवालमध्ये डिसले यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. यानंतर रणजितसिंह डिसले यांनी आपल्या सहशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. 8 ऑगस्टपर्यंत डिसले यांना राजीनामा मागे घेण्याची संधी होती. मात्र डिसले यांनी आतापर्यंत आपला राजीनामा मागे घेतलेला नव्हता.

रणजितसिंह डिसले यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने देखील त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र या अहवालातील निष्कर्ष चुकीचे असल्याचे पडताळणीत आढळले होते. त्यानंतर डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.

डिसले यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर डिसले राजीनामा मागे घेणार की त्यांचा राजीनामा नामंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज अखेर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा प्रशासनानेच नामंजूर केला आहे.

 

Smart News:-

डेड बॉडी सडत होती, तरीही FTII प्रशासनाला कळलं कसं नाही?


CM ममता बॅनर्जींनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; पंतप्रधानांकडे केली 1 लाख कोटींची मागणी


Video viral: पहिल्या पावलात आलेला मृत्यू दुसऱ्या पावलात परतला…


उमेश कोल्हेच्या हत्येनंतर डिनर पार्टीचं आयोजन; आणखी दोघांना अटक, NIA ला मोठं यश


ऐतिहासीक वारशात फुंकले प्राण, १२० वर्षांच्या शहागंज क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू

Leave a Reply

Your email address will not be published.