सोलापूर महापालिका निवडणुक, राजकीय परिवर्तनामुळे महापालिकेवर भाजपाची पकड अधिक घट्ट होणार का?

Smart News:- सोलापूर महापालिका निवडणुक, राजकीय परिवर्तनामुळे महापालिकेवर भाजपाची पकड अधिक घट्ट होणार का?

Smart News:- जिल्ह्यात साखर कारखान्याचे जाळे आणि माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनेकवेळा लोकसभा निवडणुक लढविल्याने हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील याच जिल्ह्याचे. असे असताना आता येथील स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते लोकसभा सदस्यांपर्यंत सर्वकाही भाजपाच्या ताब्यात आहे.

यातच नुकतेच  राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून पुन्हा भाजप सत्तेमध्ये सहभागी झाले आहे. असे असतनाच आता (Solapur Municipal) महापालिकेच्या निवडणुकाहोऊ घालत असल्याने सोलापूर महापिलेकवरील (BJP) भाजपाची पकड अधिक मजबूत होणार की महाविकास आघाडी एकत्र लढली तर चित्र वेगळे असणार हे पहावे लागणार आहे. राज्याच्या राजकारणात बदल झाले असले तरी त्याचे परिणाम आता स्थानिक पातळीवर दिसणार आहेत.

प्रभाग क्रमांक 13 मधील चार वार्डापैकी तीनमध्ये भाजापाचे उमेदवार विजयी झाले होते तर एका वार्डामध्ये कामगार पक्षाच्या उमेदवाराला यश मिळाले होते. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत.सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या निवडणुकीत या महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकलेला होता.

प्रभाग क्रमांक 13 कसे आहे चित्र ?
ज्याप्रमाणे सोलापूर महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक 13 ची स्थिती आहे. गतनिवडणुकीत एका प्रभागात 4 वार्ड होते तर चार पैकी तीन वार्डामध्ये भाजपाचे उमेदवार निवडूण आले होते. गत पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठा बदल झाला असला तरी गल्ली-बोळातील प्रश्नावर या निवडणुकीची गणिते अवलंबून असतात. शिवाय गतवेळी एकतर्फी भाजपाला मताधिक्य देणारे मतदार यंदा काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक लेव्हलचे प्रश्न महत्वाचे ठरणार आहेत. या प्रभागातील ‘अ’ वार्डात सुनील कामाठी, ‘ब’ मध्ये माकपच्या कामिनी आदम, ‘क’ मध्ये भाजपाच्या श्रीनिवास रिकमल्ले तर ‘ड’ मध्ये प्रतिभा मुग्दल या भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला होता. ब वार्डाचा अपवाद वगळात इतर सर्व वार्डात भाजपाचे कमळ फुलले होते.महापालिकेचे असे आहे स्वरुप
2014 च्या मोदी लाटेनंतर सोलापूर महापालिकेचेही चित्र बदलले आहे. शिवाय स्थानिक पातळीपासून सोलापुरात कमळ फुलले. नेतृत्वाने दिलेले लक्ष आणि संघटन या जोरावर कधी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तर कधी कॉंग्रेसची सत्ता असलेली महापालिका आता भाजपाच्या ताब्यात आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत. सोलापूरची लोकसंख्या 9 लाख 51 हजार 558 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 38 हजार 078 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17 हजार 982 एवढी आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत.

प्रभाग क्रमांक 13 अशी व्याप्ती
प्रभाग 13 मध्ये सोलापूरचा मध्यवर्ती भाग येतो. यंदा वार्ड फेररचना झाल्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो असे यापूर्वीच महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रभागात एकूण लोकसंख्या ही 22 हजार 737 एवढी आहे. तर उत्तर कसबा भाग, दक्षिण कसबा भाग, गोल्डफिंच पेठ, पार्क स्टेडियम, जिल्हाधिकारी कार्यालय, हरिभाई देवकर, फर्स्ट चर्च व परिसर याचा समावेश होतो. वार्ड फेररचना झाल्याने यंदाच्या निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

Smart News:-

आज सोनिया गांधींची पुन्हा ईडीकडून चौकशी होणार, 11 वाजता हजर राहण्याचे आदेश


‘अर्जुना’चा बाण कोणाकडे? एकनाथ शिंदेंसोबत की शिवसेनेमध्ये


आजचे राशी भविष्य


‘फ्युजन आवडत नाही… ‘ विरोध करणाऱ्यांना राहुल देशपांडे यांनी सुनावले


इलॉन मस्क आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे प्रेम प्रकरण? मस्कने केला इन्कार मात्र…

Smart News:-

Leave a Reply

Your email address will not be published.