अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते शरद पवार यांची बदनामी करु लागले; धनंजय मुंडे

Smart News:- अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते शरद पवार यांची बदनामी करु लागले; धनंजय मुंडे

Smart News:- देशात महागाई खुप वाढली आहे. या महागाईमुळे आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी ट्विटरच्या माध्यमातून करु लागले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुण्यात शुक्रवारी (ता.१३) एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला शरद पवार यांचा तो मूळ व्हिडिओ नसून भाजपच्याच एका नेत्याने कट-पेस्ट आणि एडिटिंग करून जाणीवपूर्वक चुकीचा आणि खोटा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

आर्यन्स ग्रुपच्यावतीने पुण्यात मिडिया हाऊस सुरू करण्यात आले आहे. या मिडिया हाऊसचे उद्घाटन शुक्रवारी मुंडे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंडे म्हणाले, “शरद पवार हे एक अद्वितीय व्यक्तीमत्व आहे. ते देश आणि जगाचे विश्व विद्यापीठ आहेत. धर्म हा काही कोणाही एकाचा नाही. पण भाजपने सध्या धर्माचा बाजार मांडला आहे.

याच्या माध्यमातून दोन धर्मांतील वातावरण खराब करायचे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, ही महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजपने केलेली खेळी आहे. महागाईचे अपयश झाकण्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला पोहोचू शकतो, हे या व्हिडिओवरुन स्पष्ट झाले आहे.

Smart News:-

राज्यात कुठेच भारनियमन नाही, यापुढेही होणार नाही- ऊर्जा मंत्री नितीन राऊत


किव्हमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरु होणार : परराष्ट्र मंत्रालय


पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला गती मिळण्यासाठी कार्यवाहीचे ‘दिनकर टेमकरांचे’ आदेश


राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे


डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या ‘सुवर्ण पालवी’ प्रदर्शनाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published.