जवानांना मिळणार मजबूत ‘सुरक्षा कवच’

Defense

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱया हिंदुस्थानच्या जवानांना आता मजबूत ‘सुरक्षा कवच’ मिळणार आहे. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने 62 हजार 500 बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी टेंडर काढले आहे(Defense).

 

या मजबूत जॅकेटमुळे जवानांची प्राणांतिक हानी कमी होऊ शकणार आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली ही बुलेटप्रूफ जॅकेट असणार आहेत. यामध्ये 47 हजार 627 जॅकेट्ससाठी जनरल निविदा तर 15 हजार जॅकेट्ससाठी आणीबाणीच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत निविदा काढली आहे. याबाबची माहिती लष्कराच्या अधिकाऱयांनी एएनआयला दिली.

कश्मीर खोऱयात दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये जॅकेट छेदणाऱया गोळय़ांचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लष्कराने तातडीने स्टील कोअर बुलेटप्रूफ जॅकेटसाठी टेंडर काढले आहे. यामध्ये बीपीजी 7.62 मिमी आर्मर पीअरिंग रायफल आणि 10 मीटर अंतरावरून गोळीबार केल्यास स्टील कोअर बुलेटपासून जवानांचे संरक्षण होणार आहे(Defense).

Smart News:-