हत्तीने महिलेला मारले; स्थानिकांची भाजप आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

MLA

चिक्कमंगलुरु: कर्नाटकच्या मुदिगेरे येथील भाजप आमदाराला चिक्कमगलुरूच्या हालेमाने गावातील लोकांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे(MLA ).

आमदार एमपी कुमारस्वामी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. हत्तीचे हल्ले थांबवण्याबाबत स्थानिकांनी आमदारांना प्रश्न विचारला, पण कोणतेही उत्तर न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केली(MLA ).

सुरक्षारक्षकाने वाचवले, जमावाने कार फोडली

कुंधुर येथील शोभा या 45 वर्षीय महिला बागेत गवत कापण्यासाठी गेली होती, यादरम्यान हत्तीने तिचा बळी घेतला. ही घटना त्यांच्या इदुवली बागेत घडली. यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाला विरोध करण्यास सुरुवात केली. या लोकांशी बोलण्यासाठी गेलेले आमदार कुमारस्वामी यांना जमावाने धक्काबुक्की केली. सुदैवाने सिक्युरिटीने त्यांना तेथून बाहेर काढले आणि गाडीत नेले. ते गाडीत बसले, पण लोकांनी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली. कुमारस्वामी कसेबसे पळून जाण्यात यशस्वी झाले(MLA ).

आमदाराचा आरोप- षडयंत्र रचले
या घटनेबाबत कुमारस्वामी म्हणाले, “काही लोकांनी जाणूनबुजून गट तयार केले आणि मला मारण्याचा कट रचला. त्यांनी अफवा पसरवली की हत्ती माझा आहे. तिथे 10 पोलिस होते पण त्यांनी मला जायला सांगितले. मला जायचे नाही, उलट तिथे थांबायचे होते आणि लोकांच्या समस्या ऐकायच्या होत्या.”

तीन महिन्यांतील तिसरी घटना
गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. दोन महिन्यांपूर्वी जवळच्या हरगोडू येथे आनंद देवाडिगा नावाच्या वनक्षेत्रपालाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उरुबेज गावच्या जंगलात अर्जुन नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. आता शोभा बळी ठरली आहे. वनविभाग कारवाई करत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Smart News:-