मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही: उद्धव ठाकरे

मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक कधीच लागली नाही, या गोष्टीचे मला समाधान आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाला मुलाखत दिली आहे. संजय राऊत  यांनी घेतलेली ही उद्धव ठाकरे यांची मुलाखत (interview) लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

या मुलाखतीचा दुसरा टिझर (interview) सोमवारी ट्विटरवर शेअर करण्यात आला. यामधील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एक वाक्य लक्ष वेधून घेत आहे. मी मुख्यमंत्रीपद भोगूनही मला सत्तेची चटक लागली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काही प्रतिक्रिया येणार का, हे पाहावे लागेल

या टीझरमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारल्याचे दिसत आहे. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याऐवजी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे का गेला नाहीत? सध्याच्या राजकारणापाठी तुम्हाला मुंबईचा घात करण्याची योजना दिसत आहे का? तुमची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी होती का?, अशा अनेक प्रश्नांनावर राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना बोलते केले आहे. ही मुलाखत मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन टप्प्यांत प्रसिद्ध होणार आहे. त्यावेळी या सर्व प्रश्नांचा उलगडा होईल. यापूर्वीही मुलाखतीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपला शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. मात्र जे शिवसेना आणि ठाकरेंना वेगळे करायला येतील त्यांना पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अंतिम टप्प्यात

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावर आज दिल्लीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळी अधिवेशनही लांबल्याने या आठवड्यातच कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. दोन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये २५ ते २८ आमदारांचा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा :


वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडलं! आईला गमावल्यानं हळहळ

Leave a Reply

Your email address will not be published.