ठाण्यात आंदोलन झालं आणि दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे

यांचं निलंबन, कर्नाटक सीमावाद (political news)आणि दिशा सालियन प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलंय. विरोधक आज सभागृहात न जाता विधिमंडळाबाहेर आंदोलन करणार आहेत. विधानसभेच्या कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत,असा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार  यांनी दिली आहे. त्याचसोबत विरोधकांकडून पायऱ्यांवर प्रतिसभागृह करण्यात आले आहे.

विरोधी पक्ष नेते(political news) अजित पवार म्हणाले, सभागृहात काल जे घडल ते चुकीचं आहे. त्यामुळे काल आम्ही यामुळे बाहेर पडलो होतो. आजही आमची तीच भूमीका असणार आहे. त्यांचं नीलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे. मात्र ती मान्य होतं नाही त्यांचं नीलंबन मागे घ्यावे अशी आमची मागणी आहे मात्र ती मान्य होतं नाही. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी ते अध्यक्षांना म्हणाले असं चित्र रंगवलं गेले हे अन्यायकरक आहे. अनेकदा सभागृहात shame shame म्हणतो याचा अर्थ मराठी मध्ये काय आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

ठाण्यात आंदोलन झालं आणि दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे अशा घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांवर आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. हे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांवर आजही चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादात अधिवेशनाचा आजचा दिवसही वाया जाणार आहे. विरोधी पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अनिल पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, अदिती तटकरे, सुनील शेळके, ऋतुजा लटके सहभागी झाले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभर आंदोलन…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आणि संयमी नेत्याचे निलंबन करुन हुकुमशाही पध्दतीने सभागृह चालवणार्‍या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा :