शिवाजी महाराजांवर असं बोलणाऱ्यांची जीभ हासडली पाहिजे

मुंबई : “ज्या लोकांची लायकी नाही आणि ज्यांना अक्कल नाही ते शिवाजी महाराजांविरोधात (chhatrapati shivaji maharaj)
अशी वक्तव्ये करतात. खरं तर अशी वक्तव्ये ऐकल्यानंतर मला खूप संताप येतो, जीभ हासडली पाहिजे यांची….”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. अगोदर राजेशाही होती, लोकांना ती नको होती. लोकशाही आली, आता लोकशाहीतले राजे कसे वागतात, कसे बोलतात तुम्हीच पाहा… मी तर म्हणेन राजेशाही पुन्हा आली पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.


राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजीराजेंविरोधात(chhatrapati shivaji maharaj) केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते आज राज्यातल्या विविध शहरांत आंदोलन करुन कोश्यारी-त्रिवेदींचा निषेध व्यक्त करत आहेत. काल फडणवीसांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदींची पाठराखण करत ते तसे बोललेच नाहीत, असं म्हणत त्यांची कड घेतली. यानंतर संभाजीराजेंनी फडणवीसांवर आसूड ओढत पाठराखण कसली करता, माफी मागायला लावा, असं म्हटलं. संभाजीराजेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. उदयराजेंनीही रोखठोक भूमिका घेत राज्यपाल आणि त्रिवेदींची अक्कल काढली.

हेही वाचा: