आणखी एक धक्का, आता आदित्य ठाकरेही मोदी सरकारच्या रडारवर

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय अस्तित्त्व आणि पक्ष वाचवण्याची दुहेरी लढाई लढत असलेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ४० (today political) आमदार आपल्या बाजूला वळवल्यानंतर आता भाजपने सेनेच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना  खासदार संजय राऊत यांना ईडीचे समन्स आले आहे.

येत्या दोन दिवसांत त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यानंतर आता युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मोदी सरकारच्या रडारवर आल्याचे चित्र आहे. (today political) कारण, आता मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे मोदी सरकारकडून ऑडिट होणार आहे.

हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून काय निष्पन्न होणार, ते पाहावे लागेल. केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच, पण उगाच मंडळ बदनामीचे धनी होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकारींनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरुही केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आदित्य ठाकरेंचा झंझावती दौरा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक भागांमधील शिवसैनिकांशी संवाद साधला आहे. निष्ठा यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील अनेक वॉर्डातील शिवसेनेच्या कार्यालयांना भेटी दिल्या होत्या. तर मराठवाड्यातील आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा चर्चेचा विषय ठरली होती.

शिवसंवाद यात्रेत नाशिक आणि औरंगाबादमध्ये झालेली आदित्य ठाकरे यांची भाषणं चांगलीच गाजली होती. या सभांमध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोरांवर सडकून टीका केली होती. आदित्य ठाकरे यांची बंडखोरांचा उल्लेख वारंवार ‘गद्दार-गद्दार’, असाच केला होता. आदित्य ठाकरे यांच्या सभा आणि रोड शो ला प्रचंड प्रतिसादही मिळाला होता.

हेही वाचा :


मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो, पण मला सत्तेची चटक लागली नाही: उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published.