शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार?

शिवसेनेमध्ये ऐतिहासिक बंड झालं आणि शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत चांगलेच सक्रिय झाले आहेत. राज्यभराचे दौरे, शिवसैनिकांच्या सभा अशा गोष्टींना वेग आला आहे. (today political news) या सगळ्या घडामोडींवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे भाष्य केलं आहे. शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सगळ्याबद्दल खुलासा केला आहे.

शिवसेना आपलीच हे सिद्ध करायला ठाकरे पुरावे देणार का या संजय राऊतांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलंय. ठाकरे म्हणाले, “माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोऱ्या-माऱ्या सगळीकडेच चालतात, (today political news) असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं की सत्यमेव जयते.

नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्यं करावी लागतील, एकतर असत्यमेव जयते आणि दुसरं वाक्य म्हणजे सत्तामेव जयते. सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत. लोक निवडणुकांची वाट पाहतायत. आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. लोक म्हणतात निवडणूक येऊ द्या यांना पुरूनच टाकू”

शिवसेना आणि संघर्ष एकमेकांच्या पाचवीला पूजलेले

शिवसेना ही तळपती तलवार ती म्यानात ठेवली तर ती गंजते. त्यामुळे ती तळपलीच पाहिजे आणि तळपणं म्हणजे संघर्ष आलाच. जिथे अन्याय तिथे वाघ हे शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे. सध्या शिवसेनेवर एक वादळ आल्याचा आभास निर्माण केला जातोय. वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतोच. तो पालापाचोळा सध्या उडतोय. एकदा तो पालापाचोळा खाली बसला की सगळं खरं दृश्य समोर येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा :


महासत्ता चौक रुंदीकरणबाबत लवकरच निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published.